Gk: सर्वाधिक जगणारा प्राणी कोणता?

14th November 2026

Created By: Aarti Borade

जगातील सर्वाधिक जगणारा प्राणी म्हणजे ओशन क्वाहॉग हा शिंपला आहे.

याचे वैज्ञानिक नाव Arctica islandica असून तो ५०७ वर्षे जगल्याचे समोर आले आहे.

२००६ मध्ये आइसलँडच्या किनाऱ्याजवळ सापडलेल्या या शिंपल्याला ‘मिंग’ असे नाव देण्यात आले होते.

त्याचे वय शेलवरील वाढीच्या रिंग्ज मोजून निश्चित केले गेले, जसे झाडाच्या वयासाठी रिंग्ज मोजतात.

हा शिंपला उत्तर अटलांटिक महासागराच्या थंड पाण्यात राहतो.

तो अतिशय हळूहळू वाढतो आणि त्यामुळेच इतके दीर्घायुष्य मिळते.