अभिनेत्री  सोनाली कुलकर्णीचा क्लासी लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संक्रांतीनिमित्त काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाच्या साडीतले फोटो तिच्या इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलुन दिसतंय. 

सर्वांना मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…’, असं कॅपशन तिने आपल्या फोटोंना दिलंय.

सोनालीचा झिम्मा हा चित्रपट काही दिवसांपुर्वी आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर तिचा भाऊ कदमसोबतच पांडू चित्रपटही गाजला.