ओव्याचे औषधी गुणधर्म

ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो

ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर सेवन केल्यास पित्त, उलट्यांच्या त्रास कमी होतो

अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घेऊन चावून खावा. त्याने अपचन दूर होण्यास मदत होईल

जर खूप दिवस सतत खोकला येत असेल, तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे

ओव्याचे पाणी उकळून घ्यावे थोडे थंड झाल्यावर पाणी गाळावे, त्यामध्ये थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे

जर सतत गुडघे दुखत असतील, तर ओवा गरम करावा, व एका रुमालात बांधून घेऊन, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक घ्यावा

अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो

ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घालून, या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते

याशिवाय ओवा भाजून त्याची पूड करावी आणि त्याने हिरड्यांवर  मालिश करावी