भारतातील 'या' 5 मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश निषिद्ध

ब्रह्मा मंदिर, राजस्थान

राजस्थानमधील ब्रम्ह्या मंदिर हे 14 व्या शतकात बांधले गेले आहे. ब्रह्मदेवाचे हे मंदिर संपूर्ण भारतात फक्त इथेच पाहायला मिळेल. या मंदिरात विवाहित पुरुषांना पूर्णपणे निषिद्ध आहे.

भगवती देवी मंदिर (कन्याकुमारी)

 कन्याकुमारीतील भगवती देवी मंदिरात भगवती देवीची पूजा केवळ महिलाच्या हस्ते केली जाते. विवाहित पुरुषांना या मंदिरात जाण्याची परवानगी नाही.

कामाख्या मंदिर (गुवाहाटी)

आसाम येथे गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर हे शक्तीपीठ आहे. मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे.

चक्कुलाथुकावू मंदिर(केरळ)

केरळमधल्या प्रसिद्ध चक्कुलाथुकावू पोंगलच्या दिवशी महिलांची पूजा केली जाते. ही पुजा 10 दिवसांपर्यंत चालते. या मंदिरात पुरुषांना प्रवेश पूर्णपणे निषिद्ध आहे.

संतोषी माता मंदिर (जोधपूर)

 जोधपूरच्या संतोषी माता मंदिरात शुक्रवारी मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. पुरुषांना फक्त मंदिराच्या दाराबाहेरुन दर्शन घेता येते.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी