चमकदार  त्वचेसाठी  मिस  युनिव्हर्सच्या  टिप्स

भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगात आपली छाप पाडली आहे. पंजाबमधील हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब पटकवत भारताला 21 वर्षांनंतर हा सन्मान मिळवून दिला आहे. हरनाजने आपल्या चमकदार त्वचेचं रहस्य सांगितलं आहे. ती दिवसात काही गोष्टी आवर्जून करते. ज्यामुळे तिची त्वचा कायम ग्लो करते.

आपल्या रोजच्या रूटीनमध्ये आपण क्लींजिंग मिल्कचा वापर करावा. क्लींजिंगचा वापर करणे हे एका सौंदर्यवतीसाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे, असं हरनाजचं म्हणं आहे. ती पुढे म्हणते की ती क्लींजिंग मिल्कचा वापर न करता घराच्या बाहेर पण पडत नाही. 

क्लीनजिंग मिल्क

बॅलन्सिंग टोनर प्रत्येक मुलीने चेहऱ्यावर वापरलं पाहिजे, असा सल्ला हरनाज देते. ते म्हणते, टोनर चेहऱ्यावर टॅप करावा, तो कधी चेहऱ्यावर घासू नये. असं केल्यास त्वचेचं नुकसान होतं. टोनर आपल्यामुळे स्किन मॉइश्चरायझ होते आणि मऊ होण्यास मदत होते.

बॅलन्सिंग टोनर 

स्किन रोज मॉइश्चरायझ करणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसभर त्वचा हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझिंगचा खूप फायदा होतो, असं हरनाज सांगते. दररोज मॉइश्चरायझिंग केल्याने आपली त्वचा कोरडी पडत नाही. तसंच चेहरा तेलकट होण्यापासून वाचतो. 

मॉइश्चरायझिंग

सूर्य किरण आणि प्रदूषणापासून त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे खास करुन महिलांनी SPF सनस्क्रीन लोशन वापरणं खूप गरजेचं असतं. ती असंही म्हणते तुमच्या चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावण्यासाठी फक्त दिवसातून 10 मिनिटं लागतात आणि यामुळे तुम्ही दिवसभर तुमचा चेहरा हायड्रेटेड राहतो

सनस्क्रीन