पत्नी आणि विराट कोहलीला एकाच संघात पाहू इच्छितो हा दिग्गज खेळाडू

25 June 2024

Created By: राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 

सुपर 8 फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली फेल गेला. पाच चेंडूचा सामना केला आणि विना खातं खोलता बाद झाला.

विराट कोहली या स्पर्धेत फेल गेला असला तरी त्याच्या क्षमतेवर कोणतंच प्रश्नचिन्ह नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने असंच दाखवून दिलं आहे. 

स्टार्कची इच्छा आहे की, विराट कोहली त्याच्या संघात खेळावा. यात त्याची पत्नी आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हीलीही आहे.

खरंच असं होईल का? असा तु्म्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण स्टार्कचं हे फक्त स्वप्न आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका व्हिडीओत स्टार्कला आपली आवडती टी20 टीम बनवण्यास सांगितलं. तेव्हा त्याने संघात विराटला स्थान दिलं. 

सुनील नरीन, एलिसा हीली, विराट कोहली, मार्कस स्टोयनिस, जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स, अँड्र्यू सायमंड, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, डेल स्टेन आणि जहीर खान.