मोहम्मद शमीने अखेर चाहत्यांना दिली खूशखबर
24 June 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
दुखापतीमुळे मोहम्मद शमी क्रिकेटपासून दूर आहे. पण त्याचं नाव सानिया मिर्झाशी जोडलं जात आहे.
चर्चा सुरु असताना शमी किंवा सानियाने कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. सानियाच्या वडिलांनी या अफवा असल्याचं सांगितलं.
असं असताना मोहम्मद शमीने स्वत: चाहत्यांना खूशखबर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते याची वाट पाहात होते.
फिटनेसबाबत शमीने एक अपडेट दिलं आहे. यामुळे शमी मैदानात लवकरच उतरेल अशी आशा आहे.
शमीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो पहिल्यांदा गोलंदाजी करताना दिसला.
मोहम्मद शमीला वनडे वर्ल्डकप दरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली आणि फिटनेसवर काम होत आहे.