मोसंबीचा रस त्वचेसाठी गुणकारी

मोसंबी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडेंट अशी पोषक घटक असतात. मोसंबी केवळ आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात मोसंबीचा समावेश केला पाहिजे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे.

मोसंबी वर्गीकरण लिंबूवर्गीय फळांमध्ये होते. लिंबाच्या रसाच्या तुलनेत हे सौम्य ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते. आपण हायपरपिग्मेंटेशन त्वचेवर ताजे पिळून काढलेला मोसंबीचा रस लावू शकतो.

ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते

ब्लॅकहेड्स आणि काळे डाग या यासाठी मोसंबीचा रस फायदेशीर आहे. मोसंबीचा रस पिऊन, आपण ब्लॅकहेड्स आणि काळ्या डागांची समस्या दूर करू शकतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते.

काळे डाग

मोसंबीचा रस मान, कोपर आणि गुडघे साफ करण्यास मदत करते. मोसंबीच्या रसात उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीबायोटिक्स जंतूपासून बचाव करण्यास मदत करतात.

त्वचेशी संबंधित समस्यांसाठी

आपण सोडाऐवजी मोसंबीचा रस घेऊ शकता. त्यात जीवनसत्त्वे असतात. हे आपल्या शरीरास डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते.

सिस्टम डिटॉक्स करण्यासाठी