पितृपक्षानंतर बाणगंगा तलावातून काढले 10,000 किलो मृत मासे अन् कचरा

24 September 2025

Created By: Swati Vemul

मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव पितृपक्षानंतर स्वच्छ करण्यात आला

रविवार ते मंगळवार या 3 दिवसांत किमान 10,000 किलो (10 टन) कचरा आणि मृत मासे तलावातून काढण्यात आले

पितृपक्षात फुलं आणि इतर गोष्टी अर्पण केल्याने तलावातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली

ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाला

बीएमसीने सांगितलं की फक्त रविवारीच तलावातून 6 हजार किलो कचरा काढण्यात आला

बाणगंगा तलावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत

तलावातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी, ताजं पाणी पुरवण्यासाठी एरेटर आणि डीवॉटरिंग पंप बसवण्यात आले

दरवर्षी पितृपक्षानंतर बाणगंगा तलावात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू होतो

जणू श्रीदेवीच..; आईची साडी नेसून रेड कार्पेटवर येताच जान्हवीने वेधलं सर्वांचं लक्ष