11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

कोण आहेत झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन? जाणून घ्या

31January 2024

Created By: Rakesh Thakur

झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून चंपाई सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे.

झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले चंपाई सोरेन आता पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

चंपाई सोरेन हे सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी आहेत.

बिहारपासून झारखंड राज्याच्या मागणीसाठीच्या चळवळीत चंपाई हे शिबू सोरेन यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिले होते.

चंपाई सोरेन यांनी अपक्ष आमदार म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर झामुमोमध्ये सहभागी झाले.

भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षाच्या 129 दिवसांच्या सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले होते.