पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे टाकले. 

23 November 2023

आयकर विभागाने तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बंगल्यात आणि कार्यालयावर छापे टाकले.

पिंपरीतील बिल्डर श्री आसवानी यांच्या घरामध्ये आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजता पाच वाहनांमध्ये आयकर विभागाची पथके शहरात दाखल झाली आहेत. 

पिंपरी चिंचवडमध्ये सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. 

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री आसवानी यांच्या घरी आणि कार्यलयात कागदपत्रांची तपासणी सुरु केली.

आयकर विभागाच्या या कारवाईची चर्चा पुणे शहरात सुरु होती.