11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

Ram Mandir: गर्दी पाहून ट्रस्टने प्रभू रामांच्या दर्शनाची वेळ बदलली

26January 2024

Created By: Rakesh Thakur

22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालली आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल केला आहे.

मंदिराबाहेर अजूनही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

प्रभू रामांची मंगला आरती सकाळी 4.30 वाजता आणि श्रृंगार आरती सकाळी 6.30 वाजता होईल.

दोन आरत्या झाल्या की सकाळी सातपासून भाविकांना प्रभू रामाचे दर्शन घेता येईल.

दुपारी 12 वाजता भोग आरती, सायंकाळी 7:30 वाजता आरती आणि रात्री 9 वाजता भोग आरती होईल. रात्री दहा वाजता शेज आरती होईल.

ट्रस्टने मंदिराच्या प्रवेशद्वारांची संख्या दोनवरून सहा केली असून भाविकांना सहज दर्शन घेता येणार आहे.