11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

भारतरत्न कोणाला दिला जातो?  कोणत्या सुविधा मिळतात?

3 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ही घोषणा केली.

‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. असाधारण आणि सर्वोच्च सेवेचा गौरव म्हणून हा सन्मान दिला जातो.

राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना सन्मान दिला जातो.

1954 मध्ये भारतरत्न फक्त जिवित व्यक्तीला देण्यात येत होता. परंतु 1955 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्याची तरतूदही जोडण्यात आली.

भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते. पण एकही पैसा दिला जात नाही.

भारतरत्न मिळालेल्या सन्मानित व्यक्तीला रेल्वे मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देते.सरकारी कार्यक्रमात आमंत्रित केले जाते.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांच्यानंतर प्रोटोकॉलमध्ये भारतरत्न प्राप्तकर्त्याचा क्रमांक लागतो.