19 फेब्रुवारी 2025
दिल्ली मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ जाणार नाहीत, कारण...
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांची निवड झाली आहे.
शपथविधी सोहळा 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होणार आहे.
दिल्ली मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार नाहीत.
योगी आदित्यनाथ यांनी पक्षाला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
विधानसभेत उत्तर प्रदेशचं बजेट सादर होणार आहे. यामुळे विधानसभेत मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यासारखंच गुजरात, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनीही येणार नसल्याचं कळवलं आहे.
20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाईल. 27 वर्षानंतर भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे.