जायफळाचे फायदे

हृदयाचं आरोग्य राहतं उत्तम

जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.

मूड स्विंग उत्तम करतं

जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.

पाचनक्रियेसाठी फायदेशीर

जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.

संक्रमणाचे आजार दूर होतात

जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. 

तोंडाची दुर्गंधी होते दूर

जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.