20 वर्षांपूर्वी भारताकडून पराभव! आता जिंकवलं कांस्य
8 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं आहे.
स्पेनला 2-1 ने पराभूत करत कांस्य पदकावर हक्क मिळवला आहे. त्यामुळे देशात आनंदाचं वातावरण आहे.
भारताच्या विजयाचे शिल्पकार कर्णधार हरमनप्रीत आणि गोलकीपर श्रीजेश आहेत. पण 'कबीर खान'ची साथ मोलाची ठरली.
क्रेग फुल्टन भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. कर्णधार असताना भारताकडून त्याला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
दक्षिण अफ्रिकेचा माजी खेळाडू क्रेग फुल्टनला मार्च 2023मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी आला.
वर्ल्डकप स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यानंतर फुल्टनने प्रशिक्षकपदी विराजमान झाला.
एका वर्षात फुल्टनने संघात बरेच बदल केले. त्याचा परिणाम पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिसला.
फुल्टन करिअरमध्ये 191 सामने खेळला आहे. 1996 आणि 2004 ऑलिम्पिकमध्ये खेळला. 2004 मध्ये भारताकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं.