रोनाल्डोने 58 दिवसातचं यूट्यूबवरून कमावले 900 कोटींहून अधिक रुपये

4 सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

ख्रिस्तियाने रोनाल्डोचे इंस्टाग्रावर 638 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर एक्सवर 112.8 मिलियन चाहते आहेत. 

इंस्टाग्राम आणि एक्सनंतर रोनाल्डोने यूट्यूब चॅनेल सुरु करत खळबळ उडवून दिली आहे. वाऱ्याच्या वेगाने सब्सकायबर्स होत आहेत. 

ख्रिस्तियाने रोनाल्डोने 8 जुलैला Ur Cristiano नावाचं चॅनेल उघडलं होतं. फक्त 58 दिवसात 56.6 मिलियन लोकांनी फॉलो केलं आहे

यूट्यूब चॅनेलचे 90 मिनिटात 1 मिलियन सब्सक्रायबर्स झाले होते. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

12 तासात 10 मिलियन सब्सक्रायबर्स झाल्याने त्याला यूट्यूबचं डायमंड प्ले बटण मिळालं होतं. 

Ur Cristiano चॅनेलवर रोनाल्डोने आतापर्यंत 28 व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्याला 388 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

यूट्यूब एका मिलियनसाठी 1200 ते 6000 डॉलर देते. रोनाल्डाने 100 मिलियन यूरो म्हणजेच 927 कोटी कमावले आहेत.