विनेश फोगाटकडून चाहत्यांसोबत सर्वात मोठी गूड न्यूज शेअर

6 मार्च 2025

भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला गूड न्यूज मिळाली आहे

विनेश फोगाट लवकरच आई होणार आहे, माजी कुस्तीपटूच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार

विनेश फोगाट हीने सोशल मीडियावरुन ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे

विनेशकडून तिचा पती सोमवीर सिंह राठी याच्यासोबतचा फोटो  इंस्टा स्टोरीत पोस्ट, "नव्या अध्यायासह लव्ह स्टोरी कायम असेल", असं विनेशने म्हटलंय

विनेश आणि सोमवीर सिंह राठी 2018 साली विवाहबद्ध

विनेशला पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत अवघ्या काही ग्रॅम वजनामुळे रौप्य पदक गमवावं लागलं होतं

विनेशने त्यानंतर कुस्तीला रामराम केला, त्यानंतर विनेशने काँग्रेसकडून  निवडणूक लढवली आणि आमदार झाली