भारतीय हॉकीपटूंना पगार मिळत नाही! खरंच की काय?
6 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
पॅरिस ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. आता पदकाची अपेक्षा आहे.
हॉकीची तुलना कायम क्रिकेटसोबत होते. पण क्रिकेटपटूंसारखा पैसा मिळतो का?
क्रिकेटपटूंसारखं भारतीय हॉकीपटू कमवत नाही. इतकंच काय तर हॉकी इंडिया त्यांना पगारही देत नाही.
हॉकी इंडिया खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ आणि साधनं उपलब्ध करूने देते. पण पगार देत नाही.
हॉकी टीममध्ये खेळणारे सर्व खेळाडून कोणत्या कोणत्या सरकारी नोकरीत असतात. त्यांना पगार तिथूनच मिळतो.
स्पर्धा जिंकल्यावर मिळणारी रक्कम खेळाडूंना वाटली जाते. इतकंच काय तर हॉकी इंडियाही बक्षीस देते.
2022 मध्ये हॉकी इंडियाने घोषणा केली होती की, प्रत्येक सामना जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूंना 50 हजार रुपये दिले जातील.