पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला लागली '4' नंबरची दशा

5 ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदरी निराशा पडली आहे. कारण खेळाडूंना चार नंबरचं ग्रहण लागलं आहे.

भारतासाठी मनु भाकर, सरबजोत सिंह आणि स्वप्निल कुसाले यांनी शूटिंगमध्ये तीन कांस्य पदक जिंकले. पण काही खेळाडू चार नंबरला राहिले.

पिस्टल शूटिंगमध्ये सलग दोन कांस्य जिंकल्यानंतर मनु भाकरला 25 मीटर प्रकारात निराशा पडली. चौथ्या स्थानावर राहावं लागलं. 

10 मीटर एअर रायफलमध्ये अर्जुन बबूताने फायनलपर्यंत एन्ट्री मारली. पण शेवटच्या फेरीत नेम चुकला आणि चौथ्या स्थानावर राहिला. 

बॅडमिंटनमध्ये भारताला लक्ष्य सेनकडून अपेक्षा होती. पण पराभूत झाल्याने चौथ्या स्थानावर राहावं लागलं.

आर्चरीमध्ये अंकिता आणि धीरजने उपांत्य फेरीत धडक मारली. पण चौथ्या स्थानावर राहावं लागलं. 

माहेश्वरी आणि अनंतजीत जोडी स्कीट शूटिंगमध्ये कांस्य पदकापासून चुकली. चीनकडून 43-44 ने पराभूत झाली.

बॉक्सिंगमध्ये निशांत पराभूत झाला. तर लवलीनाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दोन पदकं हुकली.