26 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
गोव्यात पहिल्यांदा 2025 फिडे चेस वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. इंटरनॅशनल फेडरेशनने घोषणा केली आहे. ही स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान होईल.
फिडे चेस वर्ल्डकप स्पर्धा 23 वर्षानंतर भारता होणार आहे. ही स्पर्धा शेवटची 2002 मध्ये भारतात झाली होती.
भारतात आयोजित केलेल्या या स्पर्धेत विश्वानाथन आनंद याने विजय मिळवून किताब पटकावला होता.
फिडे चेस वर्ल्डकप 2025 स्पर्धेत 206 खेळाडू भाग घेणार आहेत. बक्षिसाची रक्कम 17.5कोटी असेल.
2026 कँडिडेट्स स्पर्धेसाठी तीन स्थानेही पणाला लागणार आहेत.
2025 फिडे बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धा बाद फेरीत खेळवली जाईल. 50 मानांकित खेळाडू प्राथमिक फेरीचा भाग नसतील.
फिडे अध्यक्ष म्हणाले, भारत हा क्लासिक खेळाडू आणि उत्साही चाहत्यांसह सर्वात मजबूत बुद्धिबळ देशांपैकी एक आहे. याचं गोव्या आयोजन करण्याचा अभिमान आहे.