भारतीय हॉकी संघाचा मोठी कामगिरी, 52 वर्षांनंतर पाहिला असा दिवस
8 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकासह आपला प्रवास संपवला.
कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवला.
टोक्यो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकले होते. तेव्हा जर्मन संघाचा पराभव केला होता.
भारताने 1968 आणि 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकले होते.
52 वर्षानंतर आता पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली आहे. टोक्यो ऑआणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमने सुवर्णपदक तर ऑस्ट्रेलियाने रौप्यपदक जिंकले. यावेळी हे दोन्ही संघ बाद झाले.
भारताने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत तिसरं स्थान मिळवून आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे.