WWE चॅम्पियन बटिस्टाला ओळखणं होईल कठीण, आता झालीय अशी हालत
8 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
डब्ल्यूडब्ल्यूईमधील प्रसिद्ध कुस्तीपटू बटिस्टा पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा फोटो पाहून तुम्हीही तसंच म्हणाला.
डेव्ह बटिस्टा नुकताच टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दिसला. त्याची शरीरयष्टी पाहून अनेकांना धक्का बसला.
6 फूट 6 इंच उंच असलेल्या बटिस्टाचे वजन 130 किलो होते. इतका धिपाड वजनी बटिस्टा वेगळा दिसत आहे.
बटिस्टा आता अभिनयक्षेत्रात उतरला असून त्याने त्यासाठी वजन कमी केल्याचं बोललं जात आहे.
बटिस्टा त्याच्या काळात दोन वेळा WWE चॅम्पियन झाला आहे. शिवाय 4 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन किताबही पटकावला आहे.
बटिस्टाने गार्डियन ऑफ द गॅलेक्सी, ब्लेड रनर, रिडिक या सारख्या चित्रपटात काम केलं आहे. आगामी काळात त्याचे 9 चित्रपट रांगेत आहेत.