कोहली-धोनी नाही, नीरज चोप्राला हवंय या दिग्गज खेळाडूसारखं करिअर
17 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
भारतात कधी खेळाडूंची चर्चा होते. तेव्हा क्रिकेटपटूंची नाव समोर येतात. सचिन, विराट यांची नाव आघाडीवर असतात.
क्रिकेटपटूंनी आपल्या करिअरमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
असं असताना भालाफेकपटू नीरज चोप्राला वेगळ्याच खेळाडूची भुरळ पडली आहे.
दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या नीरज चोप्राने आवडत्या खेळाडूचा खुलासा केला.
नीरज चोप्राला फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्यासारखं करिअर हवं आहे. छेत्रीने 39व्या वर्षी निवृत्ती घेतली होती.
नीरज चोप्रा आणि सुनील छेत्री यांची पॅरिसमध्ये भेट झाली होती. तेव्हा नीरजने याबाबत सांगितलं होतं.
नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं.