नीरज चोप्राची नजर डायमंड लीग ट्रॉफीवर, जिंकल्यावर मिळणार इतकी रक्कम
12 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रा आणखी एका फायनलसाठी सज्ज झाला आहे.
ब्रुसेलमध्ये होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नीरज चोप्राची नजर आहे.
13-14 सप्टेंबरला बेल्जियमची राजधानी ब्रसेलमध्ये डायमंड लीग स्पर्धा होणार आहे. यात भालाफेक स्पर्धा 14 सप्टेंबरला आहे.
नीरज चोप्राने काही दिवसांपूर्वीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. जेतेपद मिळवण्याची शक्यता आहे.
नीरज चोप्राला जेतेपद मिळालं तर 25.19 लाखांचं बक्षीस मिळेल.
दुसऱ्या क्रमांकासाठी 10 लाख, तिसऱ्या क्रमांकासाठी 5.87 लाख, तर इतर 8 स्पर्धकांना काही ना काही मिळेल.
नीरजचा या वर्षातील सर्वात लांब भालाफेक ही 89.49 मीटर आहे. लुजैन डायमंड लीगमध्ये यश मिळालं होतं.