पॅरिस ऑलिम्पिक गोल्ड विजेत्याला पार्कमध्ये झोपण्याची वेळ
5 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नवे विक्रम रचले जात आहेत. पण त्यासोबत वादही होत आहेत.
ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट थॉमस चेकॉनवर पॅरिसच्या एका पार्कात जमिनीवर झोपण्याची वेळ आली.
चेकॉनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात टॉवेल जमिनीवर टाकून झोपलेला दिसत आहे.
पॅरिसमध्ये खेळगावातील खोल्यांमध्ये एसी नाहीत. खेळाडूंना उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे चेकॉनने पार्कमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला.
चेकॉनने नुकतंच खेळ गावातील सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. उकाडा आणि आवाजामुळे झोप येत नाही असं सांगितलं होतं.
इटलीच्या जलतरणपटूने 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली.
भारतीय खेळाडूंची गैरसोय होऊ नये यासाठी भारत सरकारने खेळगावात 40 पोर्टेबल एसी पाठवल्या आहेत.