5 कोटींपेक्षा जास्त खर्च..! नीरज चोप्राच्या भाल्याची किंमत वाचून बसेल धक्का
6 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता फेरीतच आपली छाप सोडली आहे.
नीरजने पहिलाच थ्रो 89.34 मीटर लांब फेकला आणि अंतिम फेरी गाठली.
नीरज चोप्राची सुवर्ण पदकासाठीची लढत 8 ऑगस्टला होणार आहे.
अंतिम सामन्यात जर्मनीच्या वेबर, ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं आव्हान असेल.
नीरज चोप्रा वापरत असलेल्या भाल्याची किंमत किती असावी याची आता चर्चा रंगली आहे.
नीरज चोप्राच्या भाल्याची किंमत 1.10 लाख रुपये आहे. नीरज चोप्रा असे चार ते पाच भाले बरोबर ठेवतो.
रिपोर्टनुसार, भारत सरकारने नीरज चोप्राला 100 हून अधिक भाले आणि इतर साहित्य दिलं आहे.
एका रिपोर्टनुसार भारत सरकारने नीरज चोप्रावर ऑलिम्पिकसाठी 5 कोटी 72 लाख रुपये खर्च केले आहेत.