विनेश फोगाट हीला बक्षिस म्हणून काय मिळणार?
14 ऑगस्ट 2024
Created By: संजय पाटील
महिला पैलवान विनेश फोगाट वाढीव वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, मेडल जिंकण्यात अपयशी, प्रकरण न्यायप्रविष्ठ
विनेश अपात्रता प्रकरण आणि रौप्य पदकाच्या मागणीवर 16 ऑगस्टला क्रीडा लवादाचा अंतिम निर्णय
विनेशच्या बाजूने निर्णय येवो अथवा न येवोत, भारतीय महिला कुस्तीपटूच्या मागे भक्कमपणे उभे, पदक विजेत्याप्रमाणे सन्मान
विनेशचा सन्मान होणार जसं एखाद्या रौप्य पदक विजेत्या खेळाडूचा होतो, असं हरयाणा मुख्यमंत्री नायब सिंह याच्यांकडून आधीच स्पष्ट
विनेशला हरयाणा सरकारकडून 4 कोटी मिळणार
विनेशला पानिपतच्या अजय पैलवान ग्रुपमधील तरुणांकडून 11 लाखांचं रोख बक्षिस, तर अकादमीसाठी जागा देण्यात येणार
रिपोर्ट्सनुसार, विनेशला तिच्या गावात अकादमी सुरु करण्यासाठी 2 एकर जागा दिली जाणार, जिथे पैलवानांना सराव करता येईल