फक्त एक वर्ष खेळण्यासाठी या खेळाडूला मिळणार 524 कोटी रुपये
30ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
गोल्डन स्टेट वॉरियर्सने आपल्या स्टार खेळाडू स्टीफन करीसोबत नवा केला आहे. यासह एनबीएमध्ये एक रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे.
स्टीफन करी आणखी एक वर्ष गोल्डन स्टेट वॉरियर्ससोबत खेळणार आहे. एनबीए 2026-27 पर्यंत स्टीफन करीने करार वाढवला आहे.
स्टीफन करी आणि गोल्डन स्टेट वॉरियर्स यांच्यात 62.6 मिलियन डॉलर म्हणजेच 524 कोटीचा करार झाला आहे.
स्टीफन करी आता एनबीएत आणखी एका वर्षासाठी 60 मिलियन डॉलरहून अधिक पैसे घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
एनबीएच्या इतिहासात 500 मिलियन डॉलरहून अधिक कमाई करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. लेब्रॉन जेम्स, पॉल जॉर्ज आणि केविन ड्यूरेंट यांच्या पंगतीत बसला आहे.
एनबीएत चारवेळा जेतेपद मिळवणारा स्टीफन करीने 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत संयुक्त अमेरिकेला बास्केटबॉलमद्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं.
स्टीफन करीने 2009 मध्ये एनबीएत पदार्पण केलं होतं. गेल्या 15 वर्षांपासून गोल्डन स्टेट वॉरियर्ससाठी खेळत आहे.