स्टार खेळाडूच्या पत्नीने दिला बाळाला जन्म, पण डीएनए टेस्ट करताच..
20 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
रियाल माद्रिदचा माजी फुटबॉलपटू विनिसियस टोबियास याच्या पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचं उघड झालं.
फुटबॉलपटूच्या पत्नीने नुकताच एका बाळाला जन्म दिला. पण डीएनए टेस्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला. टोबियास मुलाचा बायोलॉजिकल वडील नसल्याचं उघड झालं.
विनिसियस टोबियास आपल्या बाळाबाबत खूप खूश होता. बाळाच्या आगमनासाठी त्याने तयारीही केली होती.
टोबियासने आपल्या मुलाच्या स्वागतासाठी हातावर नावही गोंदवलं होतं. त्याने हातावर 'Maite, I love You' असं लिहिलं होतं.
रियाल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर तिला दर आठवड्याला दोन हजार यूरो म्हणजेच 1 लाख 82 हजार रुपये पाठवायचा.
इंग्रिड लिमाने यावर खुलासा करत सांगितलं की, विनिसियस आणि ती गेल्या महिन्यांपासून एकत्र नाहीत. सध्या दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यात गरोदर झाली.
लिमाने सांगितलं की, विनिसियस टोबियासला गैरसमज आहे की, तो त्याचा मुलगा आहे. दोघांमध्ये आता कोणतंच नातं नाही आणि वेगळं राहात आहोत.