विनेश फोगाटच्या हातून या गोष्टी गेल्या! पदक जिंकलं असतं तर..
7 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
विनेश फोगाट वजन जास्त असल्या कारणाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद झाली आहे.
विनेश फोगटने सुवर्ण जिंकले असते तर तिला मोठी रक्कम मिळाली असती. पण आता तिला रिकाम्या हाताने जावे लागेल.
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून रोख बक्षीस मिळत नाही.
ऑलिम्पिकमधील 48 ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमधील सुवर्णपदक विजेत्यांना प्रथमच जागतिक ऍथलेटिक्सने $50,000 (रु. 41.60 लाख) बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली होती.
भारतीय खेळाडूने सुवर्णपदक आणल्यास त्याला भारत सरकारकडून 75 लाख, रजत पदकासाठी 50 लाख, तर कांस्य पदकासाठी 30 रुपये मिळतात.
यासोबत राज्य सरकारकडून खेळाडूंना बक्षिस मिळते. बक्षिसाची रक्कम कोट्यवधींच्या घरात असू शकते.
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले तेव्हा केंद्र सरकारकडून 75 लाख, तर हरयाणा राज्य सरकारने 6 कोटी रुपये आणि श्रेणी-1 सरकारी नोकरी दिली होती