तुकोबांचे अभंग

तुकोबांचे अभंग

अभंग-1  जें का रंजलेंगांजले |  त्यासि म्हणे जो आपुलें ||1||  तोचि साधु ओळखावा |  देव तेथेंचि जाणावा ||2||

तुकोबांचे अभंग

अभंग-2  बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ||1||  येणें सोसें मन जालें हांवभरी | परती माघारी घेत नाहीं ||2||

तुकोबांचे अभंग

अभंग-3  भेटीलागीं जीवा लागलीसे आल | पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ||1|| पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन | तेसें माझें मन वाट पाहें ||2||

तुकोबांचे अभंग

अभंग-4  सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनियां ||1|| तुळसी हार गळां कांसे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि रूप ||2||