5 February 2024

भारतरत्न सन्मानित देशातील एकमेव अभिनेते, या राज्याचेही होते मुख्यमंत्री

Mahesh Pawar

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्नने सन्मानित केले जाते.

परंतु, या सर्वोच्च पुरस्काराचा आजवर केवळ एकच चित्रपट अभिनेता मानकरी ठरला आहे.

ते केवळ अभिनेताच नव्हते तर राजकारणीही होते. त्यांना हा सन्मान मरणोत्तर देण्यात आला.

तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांना राजीव गांधी सरकारच्या काळात हा सन्मान देण्यात आला

एम. जी. रामचंद्रन यांना लोक एमजीआर म्हणूनही ओळखतात.

24 डिसेंबर 1987 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला.

एमजीआर यांना भारतरत्न देण्यावरून विरोधकांनी तत्कालीन गांधी सरकारवर टीका केली होती.

1989 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी एमजीआर यांना सन्मान दिल्याचा आरोप होता.

काँग्रेसने एमजीआरच्या उत्तराधिकारी जयललिता यांच्या पक्षाशी हातमिळवणी करून 38 जागा जिंकल्या.

एमजीआर हे भारतरत्न मिळवणारे तामिळनाडूचे तिसरे मुख्यमंत्री आहेत.

याआधी तामिळनाडूच्या सी. राजगोपालाचारी आणि के. कामराज यांना भारतरत्न देण्यात आला होता.

एमजीआर यांनी 1936 मध्ये 'साथी लीलावती' या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले.

त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचा शेवटचा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झालेला 'मधुरैई मीट्टा सुंदरपांडियन' होता.

एमजीआर यांना 1965 मध्ये 'इंगा वीट्टू पिल्लई' चित्रपटासाठी फिल्मफेअर स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला होता.

1971 मध्ये 'रिक्षाकारन'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स