पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट

या योजनेत पोस्ट ऑफिस 1 ते 3 वर्षांच्या ठेवींवर 5.5 टक्के व्याजदर देते. त्याचबरोबर 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7 टक्के व्याजदर देत आहे.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम

पोस्ट ऑफिसमधील बचत योजनेमध्ये 4.4 टक्के व्याजदर निश्चित आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास 18 वर्षांनी पैसे दुप्पट होतील.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजनेत 7.6 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्यास 9 वर्षे आणि 6 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजना

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये 7.4 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे 9.73 वर्षात दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

या योजनेमध्ये 6.6 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 11 वर्षात दुप्पट होतील.

पीपीएफ योजना

पीपीएफ योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेवर 7.1 टक्के व्याजदर आहे. या योजनेत तुमची रक्कम 10.14 वर्षात दुप्पट होईल.