दक्षिण अफ्रिकेच्या पराभवानंतर डीकॉकची पत्नी अडचणीत, फॅन्सकडे मागितली मदत

2 July 2024

Created By: Rakesh Thakur

दक्षिण अफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डीकॉकचा पत्नीने चाहत्यांकडे एक मदत मागितली आहे. 

साशा डीकॉकने सांगितलं की, इंस्टाग्राम नोटिफिकेशन दरम्यान तिच्या फोनचं वायब्रेशन होत आहे. त्यामुळे वैताग आला आहे.

साशा डीकॉकने सांगितलं की, मोबाईलमधील सर्व वायब्रेशन ऑप्शन बंद करूनही इंस्टाग्राम नोटिफिकेशनवर फोन वायब्रेट होत आहे. 

साशा डीकॉकने ही अडचण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. आशा आहे की, एखादा फॅन तिची ही अडचण दूर करेल.

क्विंटन डीकॉकने 31 चेंडूत 39 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 1 षटकार मारला. पण सांघित कामगिरीत संघ तोकडा पडला. 

टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकपवर नाव कोरलं.