'मेरी ख्रिसमस' म्हणण्याचं  कारण  काय?

तुम्हांला कधी असा प्रश्न पडला आहे की, दिवाळी, होळी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी न्यू इयर', 'हॅपी होली' किंवा 'हॅपी दिवाली' असं म्हणतो मात्र ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना 'मेरी ख्रिसमस' का बोललं जातं? आज या मागचं कारण जाणून घ्या...

मेरी' आणि 'हॅपी' शब्दामधील फरक काय?

'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.

चार्ल्स डिकन्स

'मेरी' हा शब्द प्रसिद्ध होण्यामागे साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांची मोठी भूमिका मानली जाते. 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात 'मेरी' हा शब्द सर्वाधिक वापरण्यात आला, आणि त्यानंतर 'मेरी' शब्दाची प्रथा सुरू झाली.

रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. प्रभू येशूच्या आई-वडीलांना शुभेच्छा देण्यासाठी देवदूतांनी फरचे झाड सजवले होते. त्यामुळे ख्रिसमसला फरच्या झाडाला सजवले जाते.

ख्रिसमस ट्री

सांताक्लॉज

ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. असं म्हणलं जातं की सांताक्लॉज उत्तरी ध्रुवावर राहतो आणि तो उडणाऱ्या स्लेजमधून प्रवास करतो.