मुंबईच्या वादळात अडकला सरफराज खान, फोटो व्हायरल

14 May 2024

Created By: Soneshwar Patil

मुंबईच्या वादळातून भारतीय क्रिकेटपटू सरफराज खान देखील सुटू शकला नाही

सरफराज खान हा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या नेटमध्ये सराव करत होता

सराव सुरु असताना अचानक वादळ आले आणि सरफराज थोडक्यात बचावला

वादळ आल्यावर सरफराजच्या डोक्यावर संपूर्ण नेट कोसळलं

वादळाच्या वेळी सराव मैदानावरून सरफराज अडकल्याचा आवाज ऐकू येत होता

मात्र, सरफराजला त्यावेळी त्या जाळ्यातून बाहेर काढण्यात यश आले