आशियातील सर्वात श्रीमंत सासू कोण? संपत्ती पाहून...

17 April 2025

Created By: Namrata Patil

आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर अंबानी कुटुंबाचे नाव येते.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत सासू म्हटलं तर सहाजिकच कोणीही नीता अंबानींचे नाव घेईल.

पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की नीता अंबानी या भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत सासू नाहीत. 

भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत सासू दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल आहेत. 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती ३१.२ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार २,६६४.४८ अब्ज रुपये इतकी आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात त्यांच्या संपत्तीत १.५ अब्ज डॉलर्सची म्हणजे भारतीय चलनानुसार १२८.१० अब्ज रुपयांची घट झाली आहे.

सावित्री जिंदाल यांचे जावई देखील मोठे उद्योगपती आहेत. संदीप जाजोदिया असे त्यांचे नाव आहे.

संदीप जाजोदिया हे मोनेट स्टील अँड एनर्जीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.