सोज्वळ सौंदर्य म्हटलं की अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चेहरा समोर येतो.

प्राजक्ताने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहेत.

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ताचे सौंदर्य खुलून दिसत आहे. Monday blues अशी कॅप्शन तिने टाकली आहे.

सोमवार पण आहे आणि निळा ड्रेस पण आहे... असंही प्राजक्ताने लिहीलं आहे.

अभिनय आणि निखळ हास्य यामुळे प्राजक्ताने मनोरंजन सृष्टीत स्वत:चा खास ठसा उमटवला आहे.

सोशल मीडियावर ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

प्राजक्ताचे हे अनोखे, वेगवेगळे अंदाज चाहत्यांना खूप आवडतात. 

पहा व्हिडीओ