लाल किल्ल्याच्या सुरक्षतेत वाढ

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त.

15 ऑगस्ट रोजी सुरक्षा यंत्रणांनी आधीच अलर्ट जारी केला आहे.

लाल किल्ल्याभोवती ड्रोनविरोधी रडार प्रणालीचा देखील वापर होणार.

पंतप्रधानांच्या भोवती बसलेल्या सर्व नेत्यांच्या खुर्च्या दोन  यार्डांच्या  अंतरानंतर.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मर्यादित पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंनाही यावेळी पंतप्रधानांजवळ स्थान.

कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करूनच राजधानीत स्वातंत्र्य दिन साजरा होणार.

लाल किल्ल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी विषेश लसीकरण शिबिराचे घेण्यात आले होते.

स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच पंतप्रधानांच्या ताफ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी.