काजोल हिच्या द ट्रायल या वेब सीरिजीमध्ये महत्वाच्या भूमिकेत असलेली शीबा चढ्डा हिने पैशांसाठी काही भूमिका केल्या. ज्यामुळे तिच्यावर टिका झाली. यावर आता स्पष्ट बोलताना शीबा चढ्डा दिसली.
विशेष म्हणजे आता शीबा चढ्डा हिला अभिनय क्षेत्रामध्ये येऊन तब्बल 25 वर्षे पुर्ण झाली आहेत. शीबा चढ्डाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिच्यासाठी पैसा हा खूप जास्त महत्वाचा आहे.
इतकेच नाही तर तिने काही भूमिका या फक्त आणि फक्त पैशांसाठीच केल्या आहेत. मिर्झापूरसारख्या वेब सीरिजमध्ये शीबा चढ्डा हिने दमदार भूमिका केल्या आहेत.
टीव्ही, चित्रपट आणि ओटीटीवर एक काळ गाजवताना शीबा चढ्डा दिसते. 25 वर्षे सतत काम करून शीबा चढ्डाला खरी ओळख ही ओटीटीतूनच मिळाली आहे, हे सत्य आहे.
शीबा चढ्डाला 1999 मध्ये संजय लीला भंन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनम चित्रपटामध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली. यानंतर शीबा चढ्डाने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले.
विशेष म्हणजे फक्त चित्रपटच नव्हे तर यासोबतच शीबा चढ्डाने मालिकांमध्येही काम करण्यास सुरूवात केली. खरी शीबा चढ्डाला दम लगाके हइशा चित्रपटातूनच मिळाली आहे.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये शीबा चढ्डाने आयुष्यातील चढ उतारावर देखील मोठे भाष्य केले आहे. शीबा चढ्डाने स्पष्ट सांगितले की, मी बऱ्याच भूमिका या फक्त पैशांसाठी केल्या.
शीबा चढ्डा म्हणाली की, मुळात म्हणजे मी आता करिअरच्या अशा ठिकाणी आलीये, लोक आता माझे 25 वर्षांचे काम पाहून मला आॅफर देत आहेत. यामुळे नक्कीच मी खूप जास्त आनंदी आहे.