नवरात्रीचे

रंग

9

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे महत्त्व असते. दरवर्षी  नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहूयात यावर्षीचे रंग कोणते आहेत.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

पहिला दिवस (7 ऑक्टोबर)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

दुसरा दिवस (8 ऑक्टोबर)

नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दूर करतो, असे मानले जाते.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

तिसरा दिवस (9 ऑक्टोबर)

तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. आजचा रंग करडा अर्थात राखाडी, हा रंग संतुलित विचारसरणीचे प्रतिक मानले जाते. व्यक्तिला व्यवहारिक आणि साधे राहण्याची प्रेरणा देतो.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

चौथा दिवस (10 ऑक्टोबर)

चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करतात. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. हा रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा केल्यास देवी प्रसन्न होते, अशी भक्तांची भावना आहे.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

पाचवा दिवस (11 ऑक्टोबर)

पाचव्या दिवशी स्कंदमाते पूजा करतात. या देवीला पांढरा रंग आवडतो. हा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या, शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

सहावा दिवस (12 ऑक्टोबर)

सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

सातवा दिवस (13 ऑक्टोबर)

सातव्या दिवशी कालरत्री देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे. या दिवशी निळे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

आठवा दिवस (14 ऑक्टोबर)

आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे. गुलाबी रंगाचे कपडे घालून महागौरीची पूजा केल्यास प्रेमभाव जागृत होऊन मन प्रसन्न होते.

रंग

9

नवरात्रोत्सव

दिवस

नऊवा दिवस (15 ऑक्टोबर)

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नऊव्या सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री देवीला जांभळा रंग आवडतो. जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो.