पितृपक्षात लागणारेत 2 ग्रहण, विशेष काळजी काय घ्यावी?

26 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व मानले जाते. या काळात पितरांना नैवेद्य दाखवले जातात आणि श्राद्ध केले जाते.

2025 मध्ये, पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या दिवशी पौर्णिमा असेल.

ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये पितृपक्षात दोन ग्रहण होणार आहेत.

7 सप्टेंबर रोजी पितृपक्षाच्या सुरुवातीला चंद्रग्रहण होईल. हे 2025 सालचे दुसरे चंद्रग्रहण असेल.

21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपितृ अमावस्या श्राद्ध म्हणजेच पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण होईल.

यावेळी चंद्रग्रहणाच्या वेळी सुतक काळ प्रभावी असेल, या वेळी श्राद्ध विधी करू नये.

2025  मध्ये होणाऱ्या दोन्ही ग्रहणांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )