18 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात टिळा लावण्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.
जीवनात शुभ घटना घडण्यासाठी गुरु ग्रह बलवान असणं गरजेचं आहे.
कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती शुभ राहावी यासाठी केशराचा टिळा लावला जातो.
दररोज केशर टिळा लावल्याने नशीब आणि समृद्धीचं दारं खुलं होतं अशी मान्यता आहे.
केशर टिळ्यामुळे चांगला प्रभाव पडतो आणि चांगल्या गोष्टी आकर्षित होतात.
कोणत्याही शुभ कार्यापूर्वी केशर टिळा लावला तर त्यात यश मिळते, असा समज आहे.
तुम्हाला केशर टिळ्याचा तोडगा करायचा असेल तर तुम्ही गुरूवारपासून तशी सुरुवात करू शकता.