मृत्यूच्या काही क्षणाआधी तोंडात तुळशीचं पान ठेवल्यास काय होतं?

9 फेब्रुवारी 2025

मृत्यूच्या काही क्षणाआधी तोंडात तुळशीचं पान ठेवण्यामागे धार्मिक-अध्यात्मिक मान्यता आहेत, याबाबत जाणून घेऊयात

तुळशीला भगवान विष्णूचं प्रिय समजलं जातं, मृत्यूच्या काही क्षणाआधी तोंडात तुळशीचं पान ठेवल्याने त्या व्यक्तीला भगवान विष्णूचं आशीर्वाद मिळून मोक्ष प्राप्त होतो

मान्यतेनुसार, तुळशीचं पान हे यमदूतांना रोखण्यास मदतशीर, त्यामुळे मृताला यमलोकची यात्रा करताना त्रास होत नाही

तुळशीला पवित्र मानलं जातं, तुळशीचं पान माणसाच्या पापांना नष्ट करतं आणि त्या व्यक्तीला मोक्षाच्या दिशेने घेऊन जातं

काही संस्कृतींनुसार, मृत्यू वेळेस त्या व्यक्तीच्या हाती तुळशीचं देठ दिलं जातं, ज्यामुळे ती व्यक्ती प्राण त्याग करु शकेल

तुळशीचं पान हातात ठेवल्याने मृतात्म्याला शांती मिळते आणि मृत्यूवेळेस देह त्याग करताना त्रास होत नाही

अनेक संस्कृतींमध्ये तुळशीचं पान पवित्र असल्याचं मानलं जातं, तुळशीचं पान हे शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतिक आहे

मृत्यूवेळेस व्यक्तीला तोंडी गंगाजल दिलं जातं, गंगाजल पवित्र मानलं जातं, यामुळेही मोक्ष मिळण्यास मदत होते, असं म्हटलं जातं  

Disclaimer : वरील सर्व माहिती वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार आहे, टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही.