3 मार्च 2025

होळीपूर्वी या वस्तू घरी आणा, घरात येईल सुख समृद्धी!

होळी हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. होळीचा सण आता जवळ आला आहे आणि त्यासाठी तयारी सुरु झाली आहे.

धुळीवंदन हा सण 14 मार्चला आहे. तर एक दिवस आधी होळी दहन आहे. ज्योतिष आणि धर्मशास्त्रात या दहनाचं महत्त्व आहे. 

वास्तुशास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. या वस्तू होळीपूर्वी घरी आणल्या की देवी लक्ष्मीची कृपा राहते. 

वास्तुशास्त्रानुसार, होळीपूर्वी घरासाठी एक तोरण आणा आणि मुख्य दरवाज्यावर लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते. 

होळीपूर्वी धातूचा कासव घरी आणि. यामुळे भगवान विष्णुसह देवी लक्ष्मीची कृपा होते. 

वास्तुशास्त्रात बांबू ट्रीचं खूप महत्त्व सांगितलं गेलं आहे. होळीपूर्वी घरात बांबू ट्री लावा. यामुळे सकारात्मक उर्जेचा वास राहतो.