महाकुंभ मेळ्यातून या वस्तू नक्कीच घरी आणा, देवी लक्ष्मीची असेल कृपा!
महाकुंभ हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा मेळा 12 वर्षांनी चार जागी भरतो. यात प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकचा समावेश आहे.
13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी अनेक लोकं त्रिवेणीत स्नान करण्यासाठी येतील. स्नान केल्याने पापमुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
महाकुंभ मेळाव्यात स्नान केल्यानंतर ही गोष्ट आवर्जून करा. या गोष्ट घरी आणल्याने आनंदी वातावरण राहतं. तसेच देवी लक्ष्मीची कृपा राहते.
महाकुंभ मेळाव्यात स्नान केल्यानंतर त्रिवेणीचं जल घरी आणा. त्रिवेणीत गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे. या पवित्र पाण्यामुळे नकारात्मकता दूर होते.
पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनावेळी प्रयागराजमध्ये अमृताचे काही थेंब पडले होते. त्यामुळे इथली मातीही शुभ मानली जाते. त्रिवेणी संगमातील माती घरी आणल्याने सर्व प्रकारच्या ग्रहदोषातून मुक्ती मिळते.
पाणी आणि मातीशिवाय इथली फुलंही घरी आणलं शुभ मानलं जातं. कारण इथून आणलेल्या फुलांमध्येही दैवत्व असतं. तसेच देवी लक्ष्मीची कृपा राहते.