चाणक्य निती : जी व्यक्ती या 3 बाबींना वाचवले तिच बुद्धीमान ठरेल
26 July 2025
Created By: Atul Kamble
चाणक्य निती आपल्या सर्वांच्या जीवनात आजही तितकीच उपयोगी जेवढी ती त्या काळी होती
आजही चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी जीवनातील कठीण समस्यांना सोप्या करतात
संस्कृत श्लोकात चाणक्य म्हणतात की, ‘आपदर्थे धनं रक्षेद् दारान् रक्षेद्धनैरपि | आत्मानं सततं रक्षेद् दारैरपि धनैरपि||’
म्हणजे व्यक्तीला कोणतेही कष्ट वा आपात्तीकालापासून वाचण्यासाठी धनाची रक्षा,स्रियांची रक्षा आणि स्वत:ची रक्षा करायला हवी
म्हणजे जीवनात कधीही जर कष्ट नको असतील तर नेहमीच पैसे म्हणजे धनाची साठवण करावी
आणि वेळप्रसंगी धनाचा विचार न करता ते खर्च करुनही स्वत:च्या पत्नीचे संरक्षण करावे
परंतू धन आणि स्री बरोबरच किंवा त्यापेक्षा जास्त पुरुषाने आधी
स्वत:ला जपणेही महत्वाचे असते
कारण जीवनातील सर्व अडचणीतून बाहेर पडण्यासाठी पैसा कामी येतो.जेथे पैसाही कामी येत नाही तेथे जीवनसाथी कामी येतो
परंतू जोपर्यंत व्यक्ती स्वत:ची काळजी घेत नाही तोपर्यंत त्याला पैसा आणि स्री दोन्हींचा काही अर्थ राहणार नाही
चाणक्यांनी एक उपनिषदात म्हटले आहे कोणी कोणाशी प्रेम करु नका, सर्व स्वत:ला प्रेम करतात