1 september 2025
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य यांच्या मते धन कमवण्याचे योग्य आणि अयोग्य मार्गांसंदर्भात मोलाचे विचार मांडले आहेत.अयोग्य मार्गाने दौलत कमावली तर सुख लाभत नाही
चाणक्य एक महान अर्थशास्रज्ञ आणि विचारवंत होते. त्यांचे संदेश आजही जीवनात उपयोगाचे आहेत.
चाणक्य म्हणतात चोरीने, धोक्याने वा अनैतिक स्रोताने कमावलेले पैसे जीवनात सुख,समाधान आणि शांती देत नाहीत
अनैतिक मार्गाने धन मिळेल परंतू यामुळे मानसिक तणाव,कौटुंबिक वाद आणि सामाजिक अपमान होतो
चाणक्य यांच्या मते कर्जाने जमवले धन अस्थायी सुख देते.परंतू कर्जाचे ओझे जीवन तणावग्रस्त बनवते
कर्ज फेडण्याची चिंता मानसिक आणि आर्थिक रुपाने कमजोर करते.त्यामुळे कर्जापासून लांब रहा असा संदेश ते देतात
दुसऱ्यांच्या हक्क हिरावून कमावलेले धन अभिशाप बनते. हे धन ना सुख देते ना सन्मान
हक्क मारुन कमावलेले धन समाजात बदनामी, पश्चाताप आणि नैतिक अधपतन घडवते. ते सुख हिरावते
मेहनत, इमानदारी आणि नैतिकतेने कमावलेला पैसाच खरे सुखशांती देतो