21  जानेवारी 2025

घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश!

हिंदू धर्मात मंत्रसाधना प्रभावी मानली गेली आहे. मान्यतेनुसार, मंत्राच्या उच्चाराने सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो. 

मंत्रांना ब्रह्मांडीय उर्जेचं स्रोत मानलं गेलं आहे. यामुळे ब्रह्मांडीय उर्जेशी संपर्क होतो. तसेच जीवनात सकारात्मक बदल होतो, असं सांगितलं जातं. 

मंत्राच्या उच्चाराने शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. मंत्र जप करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. 

ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मात अनेक मंत्र आहेत. मंत्रांचा जप केल्याने कामात यश मिळतं. 

घरातून निघताना काही मंत्रांचा जप केला तर त्यात यश मिळते, असं सांगितलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार, घरातून निघताना 'ओम गच्छ गच्छ स्वाहा' मंत्राचा जप करावा. 

आंघोळ करून कपडे परिधान करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हात जोडून 11 किंवा 21 वेळा जप करावा. त्यानंतर इष्टदेवतेचं स्मरण करावं.